दारिद्रय़रेषेखालील बोगस याद्यांची होळी

By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:33:25+5:302016-07-01T00:33:25+5:30

चिखली येथे आ. बोंद्रेंच्या नेतृत्वात शेकडो महिला तहसील कार्यालयावर धडकल्या.

Holi of bogus lists below poverty line | दारिद्रय़रेषेखालील बोगस याद्यांची होळी

दारिद्रय़रेषेखालील बोगस याद्यांची होळी

चिखली(जि. बुलडाणा) : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी योजनेत अनेक श्रीमंतांसह चक्क चिखलीचे आ.राहुल बोंद्रे यांच्या नावाचा समावेश असल्याचे उघड झाले. यानंतर या बोगस व दारिद्रय रेषेखालील प्रकाशित यादीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते ३0 जून रोजी तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात बोगस याद्यांची होळी करून शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला. सरकारी अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कारभारामुळे आ. राहुल बोंद्रे यांचे नाव चक्क दारिद्रय़ रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर या यादीचा संदर्भ घेऊन प्रधानमंत्नी उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस जोडणीसाठीचे पात्न लाभार्थी म्हणून देखील आमदारांचे नाव गॅस एजन्सीला प्राप्त झाले असल्याने प्रशासनाच्या या बेपर्वाईमुळे खरे लाभार्थी वंचित राहून धनदांडग्यांचा समावेश असलेल्या याद्यांची ३0 जून रोजी आ. बोंद्रे यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली.

Web Title: Holi of bogus lists below poverty line