प्राध्यापकाचे वेतन रोखले

By Admin | Updated: September 14, 2014 00:48 IST2014-09-14T00:48:12+5:302014-09-14T00:48:12+5:30

सिंदखेडराजा येथील संत भगवान बाबा महाविद्यालयातील प्रकार.

Hold the salary of the professor | प्राध्यापकाचे वेतन रोखले

प्राध्यापकाचे वेतन रोखले

सिंदखेडराजा : स्थानिक संत भगवान बाबा कला महाविद्यालयातील सचिवाच्या आदेशावरून प्राचार्याने पाच महिन्याचे वेतन रोखले असून, सचिवाच्या मनमानी कारभारामुळे उपासमारीची वेळ आली असल्याची तक्रार प्रा. नीलेश देशमुख यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. संत भगवान बाबा कला महाविद्यालयामध्ये प्रा. नीलेश वसंतराव देशमुख हे १ ऑक्टोबर २00३ पासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयाला कायमस्वरूपी प्राचार्य नसल्यामुळे प्रचार्याचे पद रिक्त आहे. त्यामुळे सह संचालक उच्च शिक्षण अमरावती यांनी प्राध्यापकांसह कर्मचार्‍यांचे एक वर्षापासून वेतन रोखले होते. त्यानंतर सह संचालकांनी जुलै २0१४ ला चार महिन्याचे वेतन प्राचार्यांंच्या खात्यात जमा केले. पुन्हा १ सप्टेंबर रोजी एका महिन्याचे वेतन प्राचार्याच्या खात्यात जमा झाले. इतर प्राध्यापकांसोबत प्रा. देशमुख हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत वे तन घेण्यासाठी गेले असता, खात्यात पैसे नसल्यामुळे त्यांना परत यावे लागले. वेतन जमा झाले नसल्यामुळे प्रा. देशमुख यांनी प्राचार्य पंढरीनाथ डोईफोडे यांच्याकडे विचारणा केली. तर संस्थेचे सचिव रवी मुंढे यांच्या सांगण्यावरून वेतन रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान संस्थेचे सचिव रवी मुंढे यांनी त्या प्राध्यापकाने प्रा. नीलेश देशमुख यांनी विद्यापीठाने दिलेल्या नियुक्तीचे पत्र व इतर शैक्षणिक कागद पत्रांच्या सर्व सत्यप्रती दाखवाव्यात. त्याची सर्व शहानिशा करुन त्यांचे वेतन देण्यात येईल, असे सांगीतले.

Web Title: Hold the salary of the professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.