हिवरा बु. येथे १० गांजाची झाडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:16+5:302021-04-13T04:33:16+5:30

साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बु .येथील एका शेतातून १२ एप्रिल राेजी पोलिसांनी १० ...

Hiwara Bu. 10 cannabis plants seized here | हिवरा बु. येथे १० गांजाची झाडे जप्त

हिवरा बु. येथे १० गांजाची झाडे जप्त

Next

साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बु .येथील एका शेतातून १२ एप्रिल राेजी पोलिसांनी १० गांजाची झाडे आणि वाळलेला गांजा असा एकूण ४२ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिवरा बु. शिवारात एका रसवंतीमागे शिवाजी त्र्यंबक शेळके यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात कपाशी आणि मका ही पिके घेतली जातात. या शेतातच शिवाजी शेळके हा गांजाची शेती करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याच शेतात शेळके यांची पऱ्हाटीच्या कुडाची झोपडी असून त्या झोपडीत शिवाजी हा बसलेला आढळून आला. त्याची कसून चौकशी केली असता आणि झोपडीची झडती घेतली असता झोपडीत एका पोतडीत २ किलो ३९२ ग्राम गांजा मिळून आला. अधिकची चौकशी करून मका शेताची पाहणी केली असता शेतातील धुऱ्यावर ७ ते ८ फूट उंचीची दोन व इतर लहान मोठी १० झाडे आढळून आली. पंचासमक्ष पंचनामा आणि झाडाचे वजन केले असता २४ किलो ५२ ग्रॅम वजन भरले. पाेलिसांनी एकूण २६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी शेळके हा गांजाची झाडे लावत असून त्या झाडाचा पाला वाळवून विक्री करीत असल्याचे सूत्रांकडून समजते. या गांजा व्यवसायामागे आणखी कोण याचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दीपक राणे करीत आहेत. आरोपी शिवाजी त्र्यंबक शेळके वय ५५ वर्षे रा. हिवरा बु. यास अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार जितेंद्र आडोळे, पीएसआय दीपक राणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मुंढे, पोलीस नायक काशपाग, धूड, रमा गवई यांनी केली.

Web Title: Hiwara Bu. 10 cannabis plants seized here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.