दुचाकी व टिप्परची धडक; युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:16 IST2020-06-27T19:12:53+5:302020-06-27T19:16:46+5:30
युवक ठार झाल्याची घटना नांद्राकोळी ते बुलडाणा रोडवर घडली

दुचाकी व टिप्परची धडक; युवक ठार
ठळक मुद्देघटना नांद्राकोळी ते बुलडाणा रोडवर घडली. दुचाकीची टिप्परला धडक झाली. ऋषिकेश जंजाळ ठार झाला.
नांद्राकोळी: दुचाकी व टिप्परची धडक होऊन युवक ठार झाल्याची घटना नांद्राकोळी ते बुलडाणा रोडवर घडली. हा अपघात २६ जून रोजी रात्री १० वाजता घडला.
नांद्रकोळी येथील ऋषीकेश संजय जंजाळ (२३) हा दुचाकीने बुलडाणा जात होता. दुचाकीची टिप्पर (क्रमांक एम-एच-२८-बी-बी-१४३२)ला धडक झाली. यामध्ये ऋषिकेश जंजाळ ठार झाला. हा युवक मजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई आहे.