रत्नापूर येथे इसमाचा खून

By Admin | Updated: August 13, 2015 00:18 IST2015-08-13T00:18:49+5:302015-08-13T00:18:49+5:30

मुलीच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा संशय; मृतकाच्या वडिलाची पोस्टेला तक्रार.

His blood at Ratnapur | रत्नापूर येथे इसमाचा खून

रत्नापूर येथे इसमाचा खून

मेहकर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील रत्नापूर येथील २४ वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना १२ ऑगस्टच्या पहाटे उघडकीस आली. याबाबत मृतकाच्या वडीलाने मेहकर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठल रामचंद्र पुंड वय २४ असे असुन ते रत्नापूर येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात मृतकाचे वडील रामचंद्र नारायण पुंड यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमुद केली आहे की, माझा मुलगा मृतक विठ्ठल रामचंद्र पुंड याचे तुकाराम कुंडलीक पायघन रा.जयपूर जि.हिंगोली यांचे मुलीशी लग्न झाले होते. दरम्यान मृतकाची पत्नी एकादशी विठ्ठल पुंड हिचा १९ मे २0१४ रोजी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्याबाबत मृतक व त्याचे कुटूंबावर एकादशी हिचे वडील तुकाराम पायघन याचा रोष होता. ते नेहमी मृतक विठ्ठल पुंड व त्यांच्या नातवोईकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. घटनेच्या रात्री विठ्ठल पुंड हा त्याच्या घराचे ओसरीत झोपला असता तुकाराम कुंडलीक पायघन, सुभाष कुंडलीक पायघन व दत्ता कुंडलीक पायघन यांनी किंवा त्यांच्या हस्तकाने विठ्ठल यास कुर्‍हाडीने व धारदार शस्त्राने मारुन खून केला, असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे. यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तुकाराम पायघन, सुभाष पायघन, दत्ता पायघन सर्व रा.जयपूर जि.हिंगोली यांचे विरुद्ध कलम ३0२, ४५२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार एम.डी.राठोड हे करीत आहेत.

Web Title: His blood at Ratnapur