हिंदू महासभा १00 जागा लढणार
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:41:04+5:302014-09-18T00:41:04+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद आणि चिखली या तीन जागांचा सामावेश.

हिंदू महासभा १00 जागा लढणार
खामगाव : अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये महाराष्ट्रात हिंदू महासभा १00 जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती प्रदेश महामंत्री चंद्रहास फेरण यांनी दिली आहे. याबाबत फेरण यांनी पत्रकात नमूद केले आहे की, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली, नागपूर, यवतमाळ, वाशिम, संभाजी नगर, नांदेड, परभणी, बीड या जिल्हय़ात तसेच बुलडाणा जिल्हय़ातील तीन अशा एकूण १00 जागांवर हिंदू महासभेचे उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत. खामगाव येथील आज झालेल्या सभेत खामगावमधून संकेत शेळके, जळगाव जामोद बाळू लासुरकर, चिखली येथील तुषार गुजर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.