शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

...म्हणून मराठमोळ्या वनाधिकाऱ्याने मुस्लिम ड्रायव्हरसाठी पाळले रोजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 18:55 IST

आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण  अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे.

ठळक मुद्देसंजय माळी यांनी आपल्या मुस्लीम वाहनचालकाच्या वतीने स्वत: रोजे पाळण्याचा निर्णय घेतला. संजय माळी हे ७ मे पासून रोज पहाटे ४  वाजता उठतात आणि जेवण करतात. नंतर संध्याकाळी सात वाजता रोजा सोडतात.

बुलडाणा: येथील वन विभागात वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या एका मुस्लिम चालकाचे आरोग्य चांगले राहत नसल्याने यावेळी चालकाने रोजे ठेवले नाही. मात्र, आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण  अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे.इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९ वा महिना हा रमजानचा महिना असतो. रमजानचा महिना मुस्लीम धर्मियांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो. या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात. मुस्लिमांच्या धर्मातील अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणारा रमजानचा पवित्र महिना सध्या  सुरु आहे. मुस्लिमधर्मीय लोक रोजे पाळतात, त्यामुळे बुलडाणा वन विभागातील उपवनसंरक्षक संजय माळी यांनी त्यांचा चालक जफर यास रमजान महिना लागण्याच्या एक दिवस आगोदर रोजा विषयी विचारलं, तेंव्हा त्याने कामाच्या तणावात व प्रकृतीच्या कारणाने आपल्याला रोजे पाळणे शक्य होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी आपल्या मुस्लीम वाहनचालकाच्या वतीने स्वत: रोजे पाळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या धर्माला आड येऊ दिलं नाही. संजय माळी हे ७ मे पासून रोज पहाटे ४  वाजता उठतात आणि जेवण करतात. नंतर संध्याकाळी सात वाजता रोजा सोडतात. १६ वर्षापूर्वी केला होता नवरात्राचा उपवासउपवनसंरक्षक संजय माळी यांनी गत १६ वर्षापूर्वी नवरात्राचा नऊ दिवस कडक उपावास केला होता. तेंव्हापासून त्यांनी कुठलाच उपवास केला नाही. त्यामुळे माळी यांना उपवास पकडण्याची तशी सवय नसली तरी सध्या रोजा पकडलेला असताना कुठलीच अडचण त्यांना येत नाही. मुस्लीम बांधवाप्रमाणेच संपूर्ण नियमानुसार माळी हे रोजा पाळत आहेत.  रोजे पाळलेले असताना कुठलाच त्रास होत नाही. रोजा दरम्यान उत्साह वाटत आहे. श्रमदानही केले. तसेच दैनंदिन कामाकाजातही अडथळा नाही. व्यायाम, खेळ पूर्वीप्रमाणे सर्व व्यवस्थित सुरू आहे. - संजय माळी, उपवनसंरक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRamzanरमजानSocialसामाजिकforest departmentवनविभाग