शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी

By विवेक चांदुरकर | Updated: October 7, 2022 16:21 IST

गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली.

खामगाव - जिल्ह्यात गत दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गतवर्षी कपाशीला जास्त भाव असल्याने जिल्ह्यात २ लाख २ हजार ९९७ हेक्टरवर शासनाच्या नियोजनापेक्षा ११० टक्के जास्त पेरणी झाली होती. यावर्षीसुद्धा कपाशीला चांगला भाव आहे. मात्र, पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. ७ ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 22.1 मिमी पाऊस झाला.

गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली. शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी कपाशी पेरणीवर भर दिला. जिल्ह्यात २०२९९७.४० हेक्टरवर ११०.५९ टक्के कपाशीची पेरणी झाली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५७.१ मिमी पाऊस झाला. सध्या कपाशीच्या झाडांना बोंडे धरली आहेत. शेतकऱ्यांनी महागडी खते देऊन तसेच बोंडअळीपासून संरक्षण करण्याकरिता महागड्या औषधांची फवारणी करून कपाशीची पिके जगवली. मात्र, गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बोंडांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. कपाशीसोबतच पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आगामी एका आठवड्यात सोयाबीनची सोंगणी करून पीक बाजारात येणार आहे. काही शेतकऱ्यांनी सोंगणी करून सोयाबीनचे ढीग शेतात लावले आहेत. त्यापूर्वीच झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

आगामी पाच दिवस आणखी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. तालुक्यात ऑक्टोबर महिन्याची पावसाची सरासरी ५७.१ मिमी आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात २२.१ मिमी पाऊस झाला असून, आगामी पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच १४ ते २० ऑक्टोबरपर्यंत कोरडा आठवडा राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जिल्ह्यात ९० टक्के पाऊसजिल्ह्याची पावसाची सरासरी ७६१.६ मिमी आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ६९२.२ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या ९०.८९ टक्के पाऊस झाला आहे. बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, संग्रामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर लोणार तालुक्यात सर्वात कमी ७१.९३ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपर्यंत झालेला पाऊस

तालुका पाऊस मिमी टक्केवारीबुलडाणा ९०५.०             १०५.१८चिखली ७८५.५               ९३.६१देऊळगाव राजा ७२४.४    १०२.८१सिंदखेड राजा ८१०.०      १०१.०१लोणार ६२७.७                ७१.९३मेहकर ७७६.२                ९२.२६खामगाव ६२८.७             ८७.७५शेगाव            ६६३.८       ९७.२६मलकापूर ५५६.९             ७८.९१नांदुरा ६२९.५                 ८४.३५मोताळा ५९६.१             ८३.६७संग्रामपूर ७८१.०             १०१.८३जळगाव जामोद ५६४.४      ७९.८२सरासरी      ६९२.२           ९०.८९

आगामी पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचे लावलेले ढीग ताडपत्रीने, मेनकापडाने झाकून ठेवावे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन सोयाबीनची काढणी करावी.- मनीष येदुलवार, हवामान तज्ज्ञ, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस