बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:59 IST2017-09-15T17:57:58+5:302017-09-15T17:59:13+5:30

शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तब्बल दोन तास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले.

Heavy rains in the Buldana district, life-threatening disorder; Transportation in many places | बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली

बुलडाणा, दि. 15 - शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तब्बल दोन तास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शेतक-यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून पिकांच्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त होत आहे.

गुरूवारी रात्री रिमझिम पाऊस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारत विजेच्या कडकडाटासह सर्वत्र
जोरदार पावसाला सुरूवात झाली. सतत दोन तास पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे अनेक ठिकाणच्या नाल्यांना पूर आला. या पावसामुळे शहरातील रामनगर, धाड नाका, जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक, जांभरूण रस्ता, संगम चौक आदी ठिकाणी पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पावसाच्या जोरामुळे बुलडाणा-मलकापूर मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला तर रात्री झालेल्या रिमझिम पाऊस व सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सागवन परिसरात असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चिखली रस्त्यावरील पुलावर पाण्याचा जलस्तर वाढला. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी पुलावरील पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली.
या पावसामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागता. बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित प्रवाशांना वाहतूक बंद असल्यामुळे थांबावे लागले.
पावसाचा अंदाज घेत प्रत्येक बस सोडण्यात येत असल्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानक परिसरात दिसून आले. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वत्र धुके पसरले होते. या काळात लाईन बंद झाल्यामुळे त्याचा व्यापा-यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

जिल्ह्यात सकाळपर्यंत सरासरी १६.४ मि.मी. पाऊस यावर्षी सुरवातीपासून अल्प प्रमाणात येणा-या पावसाने आज सकाळी जोरदार हजेरी लावून मोठ्या प्रमाणात असलेलेली पावसाची तुट भरून काढली. शुक्रवारी सकाळी १० ते १२  वाजेदरम्यान जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळी ८
वाजेपर्यंत एकूण २१३ मि.मी. म्हणजे सरासरी १६.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस बुलडाणा तालुक्यात ५३ मि.मी. झाला आहे. चिखली तालुक्यात २ मि.मी., देऊळगाव राजा १४, सिंदखेड राजा १, लोणर ८, मेहकर ४४, शेगाव ४१, मलकापूर २०, नांदूरा ६, मोताळा १४, संग्रामपूर १० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Heavy rains in the Buldana district, life-threatening disorder; Transportation in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.