ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी
By सदानंद सिरसाट | Updated: October 10, 2023 14:51 IST2023-10-10T14:50:41+5:302023-10-10T14:51:29+5:30
जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी
मलकापूर (बुलढाणा) : राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील लक्ष्मीनगर नजीकच्या रेल्वे उड्डाणपुलावर कंटेनर आणि ट्रकची धडक झाल्याने तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे पुलावर कंटेनर (क्रमांक जीजे-२७, टिडी-२९७७) आणि ट्रक (क्रमांक एमएच-४६ बीएम-७०५५) या दोन वाहनांचा जोरदार अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांतील दोघे जखमी झाले. घटनेच्या वेळी कंटेनर ओव्हर टेक करीत असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये दीपक पाल, सुनीलकुमार पाल (रा. नवाई, जि. कुसुंबी) हे दोन सख्खे भाऊ तसेच कंटेनरमधील प्रवासी मजूर रहेमान बंगाल याचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहरातील युवक महेश खराटे, आकाश हुंबे, भूषण सातव, अमर थोरात, भूषण थोरात, अनिकेत चोपडे, ज्ञानेश्वर अत्तरकर, तेजस जाधव हे मदतीस धावून गेले. जखमींना तत्काळ दवाखान्यात हलविले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.