शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 00:22 IST

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार थांबविले होते. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किन्ही महादेव येथील पुरुषोत्तम दशरथ तायडे (वय २१) हा शेतमजूर २० एप्रिल रोजी शेतात शेतमजुरीचे काम करीत असताना चक्कर आल्याने बेशुद्ध झाला. हा प्रकार उपस्थित नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पुरुषोत्तम तायडे यास उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरुषोत्तम तायडे यास उष्माघात कक्षात दाखल करण्यात आले नव्हते. उपचारादरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, अकोला येथे उपचार सुरु असताना २४ एप्रिल रोजी सकाळी पुरुषोत्तम तायडे याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी पुरुषोत्तमवर उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करीत अंत्यसंस्कार थांबविले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार डंबाले आदींनी किन्ही महादेव येथे जाऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर मृतकावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पुरुषोत्तम तायडे हा बुलडाणा जिल्ह्यातील उष्माघाताचा यावर्षी पहिला बळी ठरला आहे.