सानंदा यांच्यावरील जामिनावर १४ जून रोजी सुनावणी

By Admin | Updated: June 3, 2017 01:03 IST2017-06-03T01:03:16+5:302017-06-03T01:03:16+5:30

शिवाजी व्यायाम मंदिर प्रकरण

Hearing on June 14 for bail against Sananda | सानंदा यांच्यावरील जामिनावर १४ जून रोजी सुनावणी

सानंदा यांच्यावरील जामिनावर १४ जून रोजी सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणात माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आठ आरोपींच्या अटकपूर्व अंतरिम जामीन अर्जावर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. दरम्यान, आता ही सुनावणी १४ जून रोजी ठेवण्यात आली आहे.
शहरातील श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकामप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला माजी आ.सानंदा यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आरोपी माजी आ.दिलीपकुमार सानंदा, गोकुलचंद सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, सरस्वती खासणे, दिगंंबर खासणे, जवाहर थानवी, कांतीचंद भट्टड व तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिलेला आहे. या जामिनावर २ जून रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र शुक्रवारी सुनावणी न होता, या सर्व आठही आरोपींच्या जामिनावर सुनावणीसाठी १४ जून ही तारीख देण्यात आली आहे.

Web Title: Hearing on June 14 for bail against Sananda