‘त्यांनी’ जोपासले वृक्ष संगोपन

By Admin | Updated: June 30, 2014 02:10 IST2014-06-29T23:53:15+5:302014-06-30T02:10:34+5:30

शासनाच्या अनुदानाची अपेक्षा न ठेवता लोणार येथील गवळी समाजाने प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड केली.

'He' raised the tree planted | ‘त्यांनी’ जोपासले वृक्ष संगोपन

‘त्यांनी’ जोपासले वृक्ष संगोपन

लोणार : शासनाच्या कोणत्याही अनुदानाची अपेक्षा न ठेवता येथील गवळी समाजाने प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड केली आहे. आजही गवळीपुर्‍यातील झाडे बघीतली असता, गवळी समाज वृक्ष संगोपनाची संकल्पना जोपासत असल्याचे दिसून येते.
नैसर्गीक साधन सामग्रीवर गूजरान करणारा समाज म्हणून गवळी समाजाकडे पाहिले जाते. गूरांच्या शेणापासून गोवर्‍या तयार करुन, त्या गोवर्‍या विकुन ते मिळणार्‍या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवितात. गायी, म्हशीचे पालन करुन दही, दुधाचा व्यवसाय करणारा समाज म्हणुनही गवळी समाजाची ओळख आहे. लोणार शहरात गवळी समाजाचे ७५ घरे असून, सुमारे ३00 च्यावर लोकसंख्या आहे. प्रत्येक कुटूंब आपल्या घरासमोर दोन ते तीन निंबाचे वृक्ष लाऊन त्याचे संगोपन करत आहे. त्या परिसरात आज २00 च्यावर निंबाचे वृक्ष डोलत आहेत. यामुळे उन्हाळ्यातही परिसरात गारवा राहतो. आपल्या पुर्वजांचा वसा घेत गवळी समाजातील तरुणांनीही घरासमोर एक बदामाचे झाड लावून त्याची जोपासना केली आहे. वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष संगोपनाकडे जातीने लक्ष दिल्याने ह्या वृक्षाचा फायदा आपल्या कुटुंबासह इतरांना आणि मुक्या जनावरांना होत आहे.

Web Title: 'He' raised the tree planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.