रागात निघून गेला अन् तलावात जीव दिला
By अनिल गवई | Updated: April 3, 2024 18:37 IST2024-04-03T18:36:57+5:302024-04-03T18:37:47+5:30
युवकाचा मृतदेह बुधवारी जनुना येथील तलावात आढळून आला.

रागात निघून गेला अन् तलावात जीव दिला
खामगाव: रागाच्या भरात घरून निघालेल्या शिरसगाव देशमुख येथील एका युवकाचा मृतदेह बुधवारी जनुना येथील तलावात आढळून आला. या घटनेमुळे शिरगाव देशमुख येथे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, सुनिल उपाख्य बबलू वसंता इंगळे ३५ यांचा घरी वाद झाला. या वादामुळे रागाच्या भरात घरून निघून गेले.
याप्रकरणी त्यांच्या आईने खामगाव ग्रामीण पोलीसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली होती. दरम्यान, जनुना तलावात बुधवारी सकाळी इसमाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुनिल उपाख्य बबलू इंगळे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.