ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 03:33 PM2019-12-04T15:33:27+5:302019-12-04T15:33:33+5:30

कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Hazardous weather threatens the toor crop | ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात

googlenewsNext

- योगेश देऊळकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टीमुळे सर्वच खरीप पिके शेतकºयाच्या हातून गेली आहेत. थोड्याफार प्रमाणात हाती आलेल्या उत्पादनाचीदेखील प्रतवारी घसरल्याने शेतमाल अत्यल्प भावात विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. आता सोयाबीन व कपाशीमध्ये आंतरपिक म्हणून घेण्यात आलेल्या तूर पिकावर शेतकºयांची मदार होती. या पिकाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक हातभार लागेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पश्चिम वºहाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जोमात असलेल्या तूर पिकाला या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. सध्या तुरीवर कोवळ्या शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत. आधीच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना तूर पिकाची निगा राखण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शेतकºयांची या संकटातून सुटका करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. कमीत कमी खर्चामध्ये रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरणाºया औषधांची फवारणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.

बुलडाणा, वाशिममध्ये सरासरीपेक्षा जास्त क्षेत्र
बुलडाणा जिल्ह्यात तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ६५ हजार ५३ तर वाशिममध्ये ५२ हजार ८२ हेक्टर आहे. या दोन्ही ठिकाणी सरसरीपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाली आहे. बुलडाणा ७६ हजार ५०७ तर वाशिम जिल्ह्यात ६१ हजार ९७१ हेक्टरवर प्रत्यक्षात लागवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातही तूर पिकाचे क्षेत्र समाधारकारक आहे. सरासरी ५८ हजार ६६२ असून प्रत्यक्ष लागवड क्षेत्र ५५ हजार ४९५ एवढे आहे. यावरून पश्चिम वºहाडातील तिनही जिल्ह्यात तूर पिकाची विक्रमी लागवड झाली आहे. जमिनीमध्ये ओलही भरपूर असल्याने ही परिस्थिती या पिकासाठी पोषक आहे. सध्या पडलेल्या रोगांपासून या पिकाची सुटका केल्यास शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत.

Web Title: Hazardous weather threatens the toor crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.