लग्नाची मागणी करीत महिलेचा विनयभंग; शेगावमधील घटना
By सदानंद सिरसाट | Updated: March 9, 2024 18:44 IST2024-03-09T18:43:53+5:302024-03-09T18:44:09+5:30
वाईट उद्देशाने तिचा हात धरून माझ्याशी लग्न कर नाहीतर, आत्महत्या करेल अशी धमकी दिली.

लग्नाची मागणी करीत महिलेचा विनयभंग; शेगावमधील घटना
शेगाव (बुलढाणा) : २९ वर्षीय महिलेचा हात धरून माझ्याशी लग्न कर अन्यथा आत्महत्या करेल, अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील युवकाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशीही तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील अनिकेत अनिल हिरोडे हा दारू पिऊन महिलेजवळ आला. वाईट उद्देशाने तिचा हात धरून माझ्याशी लग्न कर नाहीतर, आत्महत्या करेल अशी धमकी दिली.
यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने त्याठिकाणी पीडितेची आई व भाऊ आले. त्यांनी आरोपीला पोलिस ठाण्यात आणले, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अनिकेत अनिल हिरोडे रा. कवठा ता. तेल्हारा याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३५४,४५२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे पाटील यांच्या मार्गदर्शनात पोकाॅ. संजय करूटले, नीलेश तायडे करीत आहेत.