१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Updated: February 5, 2024 19:33 IST2024-02-05T19:33:00+5:302024-02-05T19:33:16+5:30

माहेरातून १० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरकडील मंडळीने घराच्या बाहेर काढून मारहाण केली.

Harassment of married for 10 lakhs, case filed against 6 in-laws | १० लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

खामगाव (बुलढाणा): माहेरातून १० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरकडील मंडळीने घराच्या बाहेर काढून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून मोताळा तालुक्यातील जनूना येथील सासरकडील पतीसह सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथील माहेर असलेल्या कल्पना उर्फ नयना अशोक मानकर (२६) यांचे लग्न मोताळा तालुक्यातील जनुना येथील अशोक सुनील मानकर याचे सोबत झाले.

लग्नानंतर ४ मे २०१७ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान पती अशोक सुनील मानकर, चुलत सासरा मनोहर अरविंद मानकर, सासू पुष्पा उर्फ नंदा सुनील मानकर, चुलत सासू छाया अनिल मानकर, चुलत नणंद टिंबू मनोहर मानकर व चुलत दीर मंगेश अनिल मानकर सर्व रा. जुनना, ता. मोताळा या सासरच्या मंडळीने त्रास दिला. त्या सर्वांनी संगनमत करून कल्पना मानकर यांना माहेरवरून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी वारंवार चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच घराच्या बाहेर काढून देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी आरोपींविरुध्द भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास नापोकॉ ज्ञानदेव डाबेराव करीत आहेत.

Web Title: Harassment of married for 10 lakhs, case filed against 6 in-laws