शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

बुलडाणा जिल्ह्यातील निम्मे लघू प्रकल्प कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:37 IST

बुलडाणा: भूजल पातळीत दीड मीटरने घट झालेली असतांनाच जिल्ह्यातील ८१ पैकी तब्बल ४० लघू प्रकल्प कोरडे पडले आहे.

बुलडाणा: भूजल पातळीत दीड मीटरने घट झालेली असतांनाच जिल्ह्यातील ८१ पैकी तब्बल ४० लघू प्रकल्प कोरडे पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठाही प्रभावीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.सप्टेंबर-आॅक्टोबर २०१८ दरम्यानच जिल्ह्यातील जवलपास २९ लघू प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील जवळपास ३७ पाणीपुरवठा योजनाना फटका बसला होता. त्यानंतर आता उन्हाची दाहकता जसजशी वाढत आहे तस तसा लघु प्रकल्पातील जलसाठाही झपाट्याने घटत आहे. त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर पडत आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून ९१ प्रकल्प आहेत. यापैकी दहा प्रकल्प हे मोठ व मध्यम स्वरुपाचे असून या प्रकल्पांमध्येही अवघा १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा हे तीन प्रकल्प जिल्ह्यात मोठे असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी आणि कोराडी कोल्हापुरी बंधारा हे तुलनेने मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातील जलसाठाही हा अवघा १३ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचीही अवस्था बिकट होण्याची भीती आहे. लघू प्रकल्पांचा विचार करता स्थिती अधिकच बिकट बनत चालली असल्याचे चित्र आहे. लघू प्रकल्पापैकी अवघ्या २४ प्रकल्पामध्येत दुहेरी टक्केवारीत पाणीसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. वार्षिक सरासरी प्रकल्पातील ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असते. उन्हाळ््यात हा वेग कमाल मर्यादेपर्यंत जात असल्याने ८१ लघू प्रकल्पामध्ये असलेला ५.७० टक्के जलसाठाही झपाट्याने घटण्याची भीती आहे. त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून गावातील विहीरींच्या पाणीपातळीतही त्यामुळे प्रसंगी मोठी घट होण्याची भीती आहे. परिणामस्वरुप विहीर अधिग्रहणाचीही प्रसंगी समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे पाणीटंचाई असतानाच टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांसाठी निधीचीही उपलब्धत अपेक्षीत अशी नाही. त्यामुळे येत्या काळात टंचाईचे सावट अधिकच गडद होण्याची साधार भीती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण