दुचाकीस्वाराला अडवून दीड लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: June 7, 2017 00:13 IST2017-06-07T00:13:12+5:302017-06-07T00:13:12+5:30

सिंदखेडराजा : नशिराबाद ते डावरगाव रोडवर मोटारसायकल अडवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

Half of a half-a-half of Lakhas and two lac | दुचाकीस्वाराला अडवून दीड लाखाचा ऐवज लंपास

दुचाकीस्वाराला अडवून दीड लाखाचा ऐवज लंपास

सिंदखेडराजा : नशिराबाद ते डावरगाव रोडवर मोटारसायकल अडवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत प्रभाकर भगवान देशमुख (४७) हे त्यांच्या मोटारसायकलवरुन ५ जून रोजी रात्री दहा वाजता डावरगावला जात होते. नशिराबाद ते मीराबाई कोठा रस्त्यादरम्यान अज्ञात लोक रस्त्यावर भांडणाचा देखावा करत असताना देशमुख यांनी मोटारसायकल थांबविली. तेवढ्यात एका व्यक्तीने गाडीला लाथ मारुन गाडी खाली पाडली. इतरांनी चाकूचा धाक दाखवून हात वर कर, असे म्हणून रोडच्या बाजूला नेले व खिशातील पंचावन हजार रुपये व हाताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत ९० हजार रुपये, असे एकूण १ लाख ४५ हजाराचा ऐवज लंपास केला. सदर तीन लुटारु मोटारसायकलवरुन फरार झाले. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने, सिंदखेडराजा ठाणेदार एस.एम.जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. अज्ञात आरोपींवर अप नं.८८/१७ कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक ठाणेदार संतोष नेमणार करीत आहेत.

Web Title: Half of a half-a-half of Lakhas and two lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.