११ गावांत केसगळतीची समस्या कायम! बुलढाण्यातील पाणी नमुने तपासणीसाठी नाशिकला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:47 IST2025-01-11T11:46:57+5:302025-01-11T11:47:36+5:30
शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये झालेल्या केसगळती प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्रिय

११ गावांत केसगळतीची समस्या कायम! बुलढाण्यातील पाणी नमुने तपासणीसाठी नाशिकला...
लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा : शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये झालेल्या केसगळती प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्रिय झाली असून, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने ११ ही गावांतील पाण्याचे नमुने हे नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ६३ पाणी नमुने हे भूजल सर्वेक्षणच्या प्रयोगाशाळेत पोहोचले आहेत.
पाणी व स्वच्छता विभागाच्या पथकाने शेगाव तालुक्यातील ११ ही गावांना भेटी देऊन पाहणी करत पाण्याचे नमुने गोळा केले. एक विस्तार अधिकारी व एक कर्मचारी असे दोघेजण हे पाणी नमुने घेऊन नाशिकला गेले आहेत. दुसरीकडे पाच वर्षांपूर्वी निरीनेही बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास १२ गावांतील पाणी नमुने गोळा केल्याची माहिती आहे.
आरोग्य यंत्रणा लागली कामाला
- यामध्ये नांद्राकोळी, अजिसपूरसह अन्य गावांचा समावेश होता. त्यावेळी ते अभ्यासासाठी गोळा केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- दरम्यान, पाण्यामधील हेवी मेटिलचे प्रमाण वाढण्याचे नेमके कारण काय? केस गळती का होत आहे? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा सध्या कामाला लागली आहे.