ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो; सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 15:05 IST2019-09-03T15:05:01+5:302019-09-03T15:05:08+5:30
यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.

ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो; सतर्कतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पोरज: ज्ञानगंगा प्रकल्प पूर्ण भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे. तर ३६ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
१ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकल्प १०० टक्के भरला पाटबंधारे विभागाने ज्ञानगंगा नदीकाठच्या तांदुळवाडी सिंचन शाखेअंतर्गत येणाऱ्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गत वर्षी आॅगस्ट महिन्यात १६.५० टक्के जलसाठा या प्रकल्पात होता. यामुळे खामगाव, नांदुरासह परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातही ३० टक्के जलसाठा झाला आहे.
यावर्षी पाणी परिस्थिती चांगली असल्याने गेरू माटरगाव ज्ञानगंगा प्रकल्पातून निम्न ज्ञानगंगा प्रकल्प व तेथून उन्नई बंधाºयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी ज्ञानगंगा प्रकल्पाला २ सप्टेंबर रोजी भेट दिली. यावेळी निम्म ज्ञानगंगाचे शाखा अभियंता रवींद्र पाटील, एस.एस. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)