खामगावात लाखोंचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:36 IST2021-05-23T11:36:24+5:302021-05-23T11:36:33+5:30

Khamgaon News : स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी याच्या घरी छापा मारला.

Gutkha worth lakhs seized in Khamgaon | खामगावात लाखोंचा गुटखा जप्त

खामगावात लाखोंचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक गुन्हे शाखेने तलाव रोड वरील सिंधी कॉलनी भागात लाखोंचा गुटखा जप्त करुन एका आरोपीस अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना खामगांव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी याच्या घरी छापा मारला. त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. 
यामध्ये पान मसाला १५५ पुडे किंमत २९१७२, गुटखा २२० पुड़े किंमत २२ हजार रुपये, पान मसाला लहान १०४ पुडे किंमत १२४८० रुपये, तंबाखू चे १०४ पुड़े किंमत ३१२० रुपये, तंबाखूचे मोठे पुढे १५६ किंमत ५१४८ रु, अशाप्रकारे एकूण १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. आरोपी शंकर घनश्यामदास वाधवानी याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: Gutkha worth lakhs seized in Khamgaon