खामगावात 22 हजाराचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:33 IST2020-03-29T19:32:10+5:302020-03-29T19:33:08+5:30
एसडीओ पथकाने कारवाई केली.

खामगावात 22 हजाराचा गुटखा पकडला
खामगाव: उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: मानवी आरोग्यास अपायकारक असलेला २२ हजार रुपयांचा गुटखा रविवारी खामगवातील आठवडी बाजारात पकडला. रविवारी दुपारी ही कारवाई एसडीपीओ पथकाने केली. एसडीपीओ पथकातील कर्मचारी पो.ना. सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, रविंद्र कन्नर हे चौघे आठवडी बाजारात पायी पेट्रोलिंग करीत असताना नरेश टिकमदास नागवाणी (४४) रा. झुणझुणवाला प्लॉट हे त्यांच्या ताब्यातील एका पोतडीत प्रतिबंधित गुटखा, सुंगधित तंबाखू असा एकुण २२ हजार १९२ रुपयांचा माल बाळगताना मिळून आले. त्यांच्याकडून उपरोक्त माल उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने जप्त केला. सबंधितांना अन्न व औषध प्रशासन अधिकारी बुलडाणा यांच्या समक्ष हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी बुलडाणा यांना लेखी पत्र देण्यात आले.