४८ हजारांचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST2021-04-06T04:33:54+5:302021-04-06T04:33:54+5:30

याप्रकरणी शेख मुख्तार शेख चांद (रा. गवळीपुरा बुलडाणा) याच्यविरुद्ध विविध कलमान्वये बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा ...

Gutka worth Rs 48,000 seized; Filed a crime | ४८ हजारांचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

४८ हजारांचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

याप्रकरणी शेख मुख्तार शेख चांद (रा. गवळीपुरा बुलडाणा) याच्यविरुद्ध विविध कलमान्वये बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा उपविभागात गस्तीवर असताना जामा मशीद परिसरातील महाराष्ट्र ट्रेडर्सचे मालक शेख मुख्तार शेख चांद हे त्याच्या दुकानातून तसेच बाजूला असलेल्या गोडाउनमधून सुगंधीत गुटखा व पान मसाल्याची विक्री करीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. दरम्यान, महाराष्ट्र ट्रेडर्स व गोडाउनवर शिताफीने छापा टाकण्यात आला. या दोन्ही ठिकाणी ४८ हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारीचा माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी आरोपी शेख मुख्तार शेख चांद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोउपनि नीलेश शिवाजी शेळके व पोलीस कर्मचारी विलास काकड, श्रीकृष्ण चांदुरकर, गजानन चतुर, सुभाष वाघमारे, गणेश शेळके, चालक सुनील बर्डे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. यांच्या आदेशाने पोलीस हेड काँस्टेबल प्रभाकर लोखंडे करीत आहेत.

Web Title: Gutka worth Rs 48,000 seized; Filed a crime