अधिकाऱ्यांसमक्ष पळविला जप्त केलेला गुटखा!
By Admin | Updated: July 6, 2017 20:15 IST2017-07-06T20:05:00+5:302017-07-06T20:15:59+5:30
अमडापूर येथे इंडिगो गाडीसह ११ हजार रुपयाच्या गुटखा पुडी जप्त

अधिकाऱ्यांसमक्ष पळविला जप्त केलेला गुटखा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील मदरसाजवळ इंडीगो गाडीसह गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, गुटखा विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी अरेरावी करीत गुटखा पळविला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे गोपाल मोहोरे यांनी पोलिस तक्रार केली आहे.
५ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास इंडीगो गाडीमध्ये गुटखा घेवून जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन गोपाल विनायकराव माहोरे व अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळोखे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी इंडीगो गाडी क्र.एम.एच.४ डीएल ९६३८ या गाडीचा खामगांव ते अमडापूर रोडने पाठलाग करुन अमडापूर येथील मदरसा मजिद जवळ आरोपी शे.रियाज शे.कादर व आणखी एकास गाडीसह ताब्यात घेतले. तसेच ११ हजार रूपयांचा गुटचाही जप्त केला. मात्र, गुटखा विक्रेत्यांनी काही मंडळी गोळा करून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणीत १२ गुटखा पुडीचे पोते लंपास केले. यावेळी गाडीतील दोन पोते गुटखा पुड्याचे ५५ वन पाकीट व नजर गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत गोपाल माहोरे यांनी तक्रार दिल्यावरुन आरोपी शे.रियाज शे.कादर व एक अनओळखी या दोघांविरुध्द कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संयुक्त कार्यवाही अमडापूर पो.स्टे.चे पोलिस उपनिरिक्षक उमेश भोसले, शे.युनुस एएसआय संजय नागवे, पो.ना.शाकीर पटेल, भगवान नागरे ह्यांनी सहभाग घेतला होता.