दोन लाखांचा गुटखा पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:50 IST2017-08-03T00:49:49+5:302017-08-03T00:50:36+5:30

खामगाव : येथील किसननगरजवळ गुटखा घेऊन जाणारी क्रुझर पोलिसांनी पकडली. सदर गाडीत २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर गुटख्यासह क्रुझर गाडी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. 

Gutka caught two lakhs! | दोन लाखांचा गुटखा पकडला!

दोन लाखांचा गुटखा पकडला!

ठळक मुद्देवाहनासह गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यातगाडीत आढळला २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील किसननगरजवळ गुटखा घेऊन जाणारी क्रुझर पोलिसांनी पकडली. सदर गाडीत २ लाख ११ हजार ५२0 रुपयांचा गुटखा मिळून आला. सदर गुटख्यासह क्रुझर गाडी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. 
 किसननगरात क्रुझर गाडीने गुटखा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मंगळवारी रात्री मिळाली. याबाबत शहर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविले. त्यावरून शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय जयपाल ठाकूर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोकॉं सुनील देव, दिनेश देशपांडे, रवींद्र कन्नर, विक्रम राठोड यांनी रात्री ८ वाजेदरम्यान किसननगरात जाऊन क्रुझर क्र.एमएच २८ व्ही-६१२६ ची तपासणी केली असता, त्यात मोठय़ा प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा मिळून आला. यावेळी पोलिसांनी गुटख्यासह सदर गाडी जप्त करून, गाडीचालक राम भारत देवकते (वय २३) रा. चांदमारी यास अटक केली. सदर जप्त केलेला गुटखा व गाडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिली 

Web Title: Gutka caught two lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.