ई-पीक पाहणीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:17+5:302021-09-25T04:37:17+5:30

सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार यांनी राहेरी, ताडशिवनी, दुसरबीड, लिंगा, पिंपळगाव कुडा अशा अनेक गावांमधील शेतकऱ्यांना ...

Guidance to farmers on e-crop survey | ई-पीक पाहणीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ई-पीक पाहणीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार यांनी राहेरी, ताडशिवनी, दुसरबीड, लिंगा, पिंपळगाव कुडा अशा अनेक गावांमधील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीविषयी मार्गदर्शन केले. ३० सप्टेंबरपर्यंत ई-पीक नाेंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी देऊळगाव राजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजू शिरसाठ, विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे, विलासराव देशमुख उपस्थित होते. तसेच सरपंच रवी बरांडे, उपसरपंच सुभाषराव देशमुख, पत्रकार विठ्ठल देशमुख, दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब देशमुख, समाधान गवई, एकनाथराव देशमुख, प्रदीपराव देशमुख, रामजी देशमुख, पवन सरकटे, अनिल गवई, मच्छिंद्र साळवे, वसंतराव गवई, विलास देशमुख, गोविंद देशमुख आदी शेतकरी उपस्थित हाेते.

Web Title: Guidance to farmers on e-crop survey