धावत्या रेल्वेतून पडल्याने गार्ड जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:42 IST2017-09-16T00:30:44+5:302017-09-16T00:42:23+5:30
खामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली. १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच खळबळ उडाली.

धावत्या रेल्वेतून पडल्याने गार्ड जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली. १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावरून मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल मलकापूरचे निरीक्षक राजेश बनकर व त्यांच्या चमूने विशेष खुपीया शाखेचे रंजन तेलंग यांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली असता, दुपारी २ वाजताच्या सुमारास सदर गार्ड मलकापूर बसस्थानकावर असल्याचे समजले. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या चमूने मलकापूर बसस्थानक गाठले असता या ठिकाणी गार्ड पंकज महाले (वय ३५) हे जखमी अवस्थेत आढळून आले. महाले हे मालगाडीतून पडल्याने किमी नं. ४६५ वर जखमी झाले होते. तेथील गावकर्यांनी त्यांना मलकापूर बसमध्ये बसून दिले. रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने त्यांना लगेच भुसावळ येथे आणून उपचार केले. याकरिता रेल्वे सुरक्षा बलाचे बनकर यांच्यासोबत आरक्षक गजानन जाधव, साबळे, भोले, इंद्रलोक तसेच विशेष खुपीया शाखेचे रंजन तेलंग यांचे सहकार्य लाभले.