शेतक-यांचा कृषी अधिका-यांना घेराव
By Admin | Updated: September 19, 2014 00:55 IST2014-09-19T00:24:39+5:302014-09-19T00:55:02+5:30
मोताळा तालुक्यातील शेतक-यांची ठिबकचे अनुदान देण्याची मागणी.

शेतक-यांचा कृषी अधिका-यांना घेराव
मोताळा : शेतक-यांना ठिबकचे अनुदान त्वरित मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी शेतकर्यांसह आज कृषी कार्यालयात जाऊन कृषी अधिकारी मोहन पवार यांना घेराव घातला. यावेळी कृषी अधिकारी पवार यांनी पूर्व संमती दिलेले अर्ज रद्द करून क्रमवारीनुसार अर्ज मंजूर करण्याचे सांगितल्यावर घेराव मागे घेण्यात आला.
तालुक्यातील १९७७ शेतकर्यांनी ठिबकचे अनुदान मिळावे यासाठी येथील कृषी कार्यालयाकडे अर्ज सादर केलेले आहेत. त्यापैकी फक्त ७७ शेतकर्यांच्या अर्जांनाच पूर्व संमती मिळालेली आहे. सदर अर्ज क्रमाने मंजूर न करता, कंपनीच्या अधिकार्यांशी हातमिळवणी करून काहींचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांसह उपस्थित शेतक-यांनी केला आहे.