राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:50+5:302021-06-18T04:24:50+5:30

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरूवारी राजवाड्यात अत्यंत साधेपणाने त्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ११ वाजता राजवाडा येथील जिजाऊंच्या ...

Greetings to Queen Jijau | राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरूवारी राजवाड्यात अत्यंत साधेपणाने त्यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ११ वाजता राजवाडा येथील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंशज राजे शिवाजीराव जाधव, नगराध्यक्ष सतीश तायडे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नगरसेवक विजय तायडे, अमोल ठाकरे, शहाजी चौधरी, राजेंद्र आढाव, गजानन मेहेत्रे आदींची यावेळी उपस्थिती होती.

जिजाऊ सृष्टी येथे वृक्षारोपण

स्मृतीदिनानिमित्त जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊ पूजन करण्यात आले. जिजाऊ सृष्टी येथील शिव धर्म पीठ येथे वड, पिंपळ या झाडांच्या एकशे एक रोपांची लागवड जिजाऊ वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जालना येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सवने, शिवाजीराजे जाधव, बाळासाहेब देशमुख, बालाजी नखाते संदीप सोळंके यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Greetings to Queen Jijau