भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:40+5:302020-12-26T04:27:40+5:30
बुलडाणा : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल वाजपेयी यांना जयंती दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मा. आमदार ...

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन
बुलडाणा : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल वाजपेयी यांना जयंती दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय "शिवालय" येथे अभिवादन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.२५) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १८ हजार कोटी रुपयांचा निधी नऊ हजार काेटी शेतकऱ्यांच्या खात्यात एका वेळी बटण दाबून ट्रान्सफर केला. तसेच शेतकऱ्यांशी नवीन पारित केलेल्या केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाबाबत लाइव्ह संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शुक्रवारी ‘शिवालयात’ दाखविण्यात आले होते.
मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते स्व.अटलजींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव मा. दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष पुरषोत्तम लखोटिया, प्रभाकर वारे, ॲड. दि. दा. पाटील, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, ज्ञानेश्वर राजगूरे, दत्ता पाटील, नगरसेवक मंदार बाहेकर, वैभव इंगळे, स्मिता चेकेटकर, अल्काताई पाठक, नंदिनी साळवे, भाजयूमो शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, ॲड. दशरथसिंग राजपूत, गोपालसिंग राजपूत, दिलीप तोटे, प्रदीप तोटे, राजेंद्र पवार, किरण नाइक, सोनू बाहेकर, मोहम्मद सोफियान, राशिद शेख, गोडबोले काकाजी, विजय जायभाये आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.