मलकापूर पंचायत समितीसमोर ग्रामसेवकांचे असहकार व धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:25 PM2018-06-18T17:25:04+5:302018-06-18T17:25:04+5:30

मलकापूर :  जिल्हाभरातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा विषयक विविध अडचणी सोडवण्यासाठी सोमवारी मलकापूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Gramsevak's non-cooperation and dharna movement in front of Malkapur Panchayat Samiti | मलकापूर पंचायत समितीसमोर ग्रामसेवकांचे असहकार व धरणे आंदोलन

मलकापूर पंचायत समितीसमोर ग्रामसेवकांचे असहकार व धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्दे१ जून २०१८ पासुन जिल्हाभर असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी धरणे देण्यात आले.

मलकापूर :  जिल्हाभरातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा विषयक विविध अडचणी सोडवण्यासाठी सोमवारी मलकापूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

                    ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली. याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई-१३६ यांचे ठरावानुसार १ जून २०१८ पासुन जिल्हाभर असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी धरणे देण्यात आले.

 या आंदोलनात अध्यक्ष दीपक ठाकूर, सचिव गोपाल आमले, कोषाध्यक्ष माधव देशमुख, सुनिल हिवाळे, नितीन कठाळे, प्रतापसिंह नामकुडा, अक्षय साळवे, अनिल तेलंग, गजानन झनके, रामसिंह जाधव, नरेंद्र तायडे, शत्रुघ्न बघे, पी.डी. खर्चे, एम.जी. जाधव, किरण ताम्हणे, दर्शन सुरळकर, सचिन पाटील, संध्याताई निंबोळे, जयश्री नाफडे, अर्चना माहुरे, अपेक्षा चोथमल, प्रकाश जैस्वाल, एन.एम. झाल्टे यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. धरणे आंदोलन मंडपास शिवचंद्र तायडे, संतोषराव रायपुरे, दादाराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी फाळके, प्रधान  यांनी भेट दिली.

Web Title: Gramsevak's non-cooperation and dharna movement in front of Malkapur Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.