ग्रामपंचायत निवडणूक; शहरी भागातील व्यवसायावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST2021-01-03T04:34:37+5:302021-01-03T04:34:37+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बैठका, पार्ट्या सध्या सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शेतकरी वर्गही तूर काढण्याच्या कामात व्यस्त ...

ग्रामपंचायत निवडणूक; शहरी भागातील व्यवसायावर परिणाम
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बैठका, पार्ट्या सध्या सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शेतकरी वर्गही तूर काढण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. रस्त्यावर फळ विक्रेते, कपडे, पादत्राणे, फरसान विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अस्थायी व्यावसायिकांच्या व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे चित्र येते आहे, त्यामुळे हातगाडीवर दुकान लावून व्यवसाय करणाऱ्या काहींनी त्यांची दुकानेच बंद केल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुका होईपर्यंत तरी दुकान बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याचे येथील काही अस्थायी व्यावसायिकांनी सांगितले. ग्रामीण भागात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिक व मतदार आपल्या आपल्या पैनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आतापासून फिल्डींग लावत आहेत. त्यातच दुरीचा बार काढण्यासाठी काही शेतकरी थेट शेतात जात आहेत. त्याचाही परिणाम शहरी भागातील व्यवसायावर होत आहे. मेहकर शहराशी परिसरातील ३० ते ३५ खेडी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे या सर्व बाबीचा येथे दृश्य परिणाम लगेच जाणवत आहे.
कोट
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या निवडणुकीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मतदान होईपर्यंत दुकान न थाटण्याचा निर्णय घेतला आहे.
मेहबूब बागबान, फळ विक्रेता मेहकर.