शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

...तोपर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 12:03 PM

Gram Panchayat Election: ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे.

ठळक मुद्देपडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे.खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याऐवजी त्या जागांसाठी प्रत्येकी केवळ अर्ज दाखल करून सर्व जागांवर सदस्यांची अविरोध निवड करण्याचा प्रयत्न अनेक गावांमध्ये झाला. तो प्रकार ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे. तोपर्यंत त्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही, असे पत्र निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी यंत्रणा निर्माण झाली. या सर्वच यंत्रणांचा कारभार पाहण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून लाेकप्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, चालू ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील काही आमदारांनी शासकीय नि‌धी देण्याचे आमिष दाखविले, तर काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी लिलाव करण्यात आला. त्यातच काही गावांमध्ये गावगुंड प्रवृत्तीमुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासही मज्जाव केला जाण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता निवडणूक आयोगाने आधीच अविरोध निवड होणे, संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध होणे, याबाबत तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार चालू निवडणुकीत अविरोध होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष गावात जाऊन तहसीलदार पडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे. आयोगाची खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही. त्यामुळे पडताळणी होईल.  

निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच तसे पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार अ‌विरोध ग्रामपंचायतींबाबत तहसीलदारांचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल घेतला जाणार आहे. - दिनेश गिते,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkhamgaonखामगावElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग