महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी सरकार शिफारस करणार!
By Admin | Updated: April 15, 2016 02:17 IST2016-04-15T02:17:24+5:302016-04-15T02:17:24+5:30
आ. कुटे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी सरकार शिफारस करणार!
जळगाव जामोद(जि. बुलडाणा) : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीस १२५ वर्ष झाल्याच्या पृष्ठभूमीवर राज्यात बृहत कार्यक्रम राबविण्यात येणार असून, महात्मा फुले यांना ह्यभारतरत्नह्ण हा सर्वोच्च सन्मान देण्यात यावा, यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याची माहिती १३ एप्रिल रोजी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली. आ.डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची दखल घेत शतकोत्तर पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारतर्फे बृहत कार्यक्रम तयार करून तो राबविल्या जाईल असेही ते म्हणाले.