दुचाकी पुलाला धडकून शासकीय कर्मचारी गंभीर; खामगाव अकोला रोडवरील घटना
By अनिल गवई | Updated: April 19, 2024 17:36 IST2024-04-19T17:36:28+5:302024-04-19T17:36:40+5:30
दुचाकीने जात असताना कोलोरी फाट्यावरील रोडच्या पुलाला (मोरीला) त्यांची दुचाकी धडकली

दुचाकी पुलाला धडकून शासकीय कर्मचारी गंभीर; खामगाव अकोला रोडवरील घटना
खामगाव: भीषण रस्ता अपघातात अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना कोलोरी फाट्याजवळील टोल नाक्यावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, गणेश प्रेमचंद भोपळे (३१, रा. शिंदेफळ ता. सिल्लोड जि. जालना ) अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून नियुक्त आहेत. दुचाकीने जात असताना कोलोरी फाट्यावरील रोडच्या पुलाला (मोरीला) त्यांची दुचाकी धडकली. त्यानंतर ते पुलावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने भोपळे यांना त्वरीत अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सामान्य रूग्णालयातील सुत्रांनी दिली.