गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:54 PM2020-01-01T13:54:48+5:302020-01-01T13:55:02+5:30

या बैठकीत पाणी पुरवठा, घरकुल आणि शौचालयासंबधित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

Gopikisan Bajoria reviews Khamgaon municipality | गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा

गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगर पालिकेतंर्गत विविध समस्या तसेच प्रश्न तडीस नेण्यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीकिसन बजोरीया यांनी बुधवारी खामगाव पालिकेचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुखांकडून आ. बजोरीया यांनी माहिती घेतली.
 या बैठकीला मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, बांधकाम अभियंता निरंजन जोशी, पाणी पुरवठा तथा आरोग्य अभियंता प्राजक्ता पांडे, विद्युत अभियंता सतीश पुदाके, सहा. कर अधिक्षक शंकर नेहारे, राजेश मुळीक यांच्यासह खामगाव पालिकेतील अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत पाणी पुरवठा, घरकुल आणि शौचालयासंबधित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.


घरकुल योजनेच्या पीएमएसीवर ठपका!
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खामगाव नगर पालिकेत मुंबई येथील देवधर असोसिएटस् या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ही प्रकल्प व्यवस्थापन समिती घरकुल योजनेचे कामकाज रखडविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. आपल्या भागातील पीएमसी सोडून मुंबईची पीएमसी नियुक्त करण्यावरही आ. गोपीकिसन बजोरीया यांनी आक्षेप नोंदविला.

 
वाढीव पाणी पुरवठा योजनेचीही घेतली माहिती!
खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजाची विस्तृत माहिती आ. बाजोरीया यांच्याकडून घेण्यात आली. या योजनेचे कामकाज रखडल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामास दिरंगाईबाबतही त्यांनी सुरूवातीच्या खासगी पीएमसीलाच दोष दिला. पीएमसीने चुकीचे काम केले असल्यास त्यांना सुरूवातीला चुका सुधारण्याची संधी द्या, त्यानंतर नोटीस द्या, दोन्ही गोष्टी केल्यानंतर त्यांच्या कामात सुधारणा अथवा अपेक्षीत सहकार्य न मिळाल्यास त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची तरतूद करा, अशा सूचनाही आ. बजोरीया यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Gopikisan Bajoria reviews Khamgaon municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.