धाड येथे गुड मॉर्निंग पथकाची धाड
By Ram.deshpande | Updated: July 25, 2017 19:57 IST2017-07-25T19:57:08+5:302017-07-25T19:57:33+5:30
धाड : शासनाच्यावतीने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी सकाळी गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात आली असून, उघड्यावर जाणाºयांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

धाड येथे गुड मॉर्निंग पथकाची धाड
ठळक मुद्देउघड्यावर बसणा-यांवर पोलिस कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : शासनाच्यावतीने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी सकाळी गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात आली असून, उघड्यावर जाणाºयांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ग्रामीण भागात दररोज गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी पहाटे धाड टाकण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पहाटे पाच वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत पथकाने विविध भागातील लोकांना पकडले. पथकातील सदस्यांनी उघड्यावर जाणाºयांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.