शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हौसेला मोल नाही...चिखलीतील व्यक्तीने बनवून घेतला सोन्याचा मास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:51 AM

चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे.

ठळक मुद्देया मास्कची अंदाजे किंमत ३ लाख ७० हजार रुपये आहे. दीपक वाघ या व्यक्तीने सोन्याचा मास्क तयार करून घेतला.

- सुधीर चेके पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : आजघडीला सोन्याच्या भावाने ५४ हजार ७०० रूपये प्रतितोळा प्रमाणे उच्चांकी भाव गाठला आहे. मात्र, अशा स्थितीतही येथील एका व्यक्तीने चक्क साडेसहा तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याने ‘हौसेला मोल नसते’चे प्रत्यंतर आले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळातही बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे शहरात चांगलीच खुमासदार चर्चा रंगत आहेत.आपल्या देशात बहुसंख्य पुरूष लोकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. या हौसेतून अनेकजण ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जात असल्याने आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी अनेक जणांकडून सोन्याचे दागीने वापरण्यात येतात. दरम्यान, कोरानामुळे सध्या सर्वत्र ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असल्याने या महामारीच्या काळातही कोल्हापूर, पुणे, बार्शी पाठोपाठ आता चिखली शहरातील दीपक वाघ या हौशी व सोन्याची आवड असलेल्या व्यक्तीने सोन्याचा मास्क तयार करून घेतला. सर्व जग कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असताना आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावलेले व सोन्याचे भाव गगणाला भिडलेले असताना चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे. चिखली येथीलच काछवाल ज्वेलर्स या दुकानातून त्यांनी हा मास्क तयार करून घेतला.या मास्कची अंदाजे किंमत ३ लाख ७० हजार रुपये आहे. दीपक वाघ यांना सोनं वापरण्याची आवड आहे. त्यांच्या गळा, हात नेहमीच सोन्याच्या आभुषणांनी मढलेला असतो. काही दिवसांपूर्वी सोन्याचा मास्कविषयी आलेल्या बातम्या पाहून आपणही सोन्याचा मास्क तयार करून घ्यावा, ही कल्पना आवडली आणि त्यांनी तसा मास्क तयार करून घेतला.यापूर्वी राज्यातील विविध भागातून सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. त्याच पृष्ठभूमीवर चिखली येथील व्यक्तीने तयार करून घेतलेला सोन्याचा मास्क सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली