सरकारी जागेत राहणाऱ्यांना आठ अ नक्कल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST2021-02-05T08:30:50+5:302021-02-05T08:30:50+5:30

अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत गावात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना राहत्या ...

Give eight copies to those living in government space | सरकारी जागेत राहणाऱ्यांना आठ अ नक्कल द्या

सरकारी जागेत राहणाऱ्यांना आठ अ नक्कल द्या

अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत गावात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना राहत्या जागेची ग्रामपंचायत आठ रेकॉर्डला नोंद घेऊन आठ नक्कल मिळावी याकरिता चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाबाबत इशारा चिखली गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्याकडून निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद की चिखली तालुक्यातील सर्वच गावात विभक्त कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जागेत ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून राहत असून, सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे. त्यांना आठ नक्कल नसल्यामुळे नवीन शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्यामुळे अन्नधान्य मिळत नाही. हे कुटुंब हे शेतमजुरी, हमाली, घरकाम, लघुउद्योग करून आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक आहेत तसेच यामध्ये अपंग बांधवसुद्धा आहेत. सदर कुटुंबांना आठ नक्कलची अत्यंत आवश्यकता असून त्यांना राहत असलेल्या जागेची ग्रामपंचायत रेकॉर्ड होणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या जागेची नोंद झाल्यास ग्रामपंचायत करातसुद्धा वाढ होईल व गावातील विकास कामाकरिता सामान्य फंड जमा होईल. तरी चिखली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी अतिक्रमण करून राहणारे कुटुंबांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत रेकॉर्डला सदर जागेची नोंद घेऊन सदर रहिवाशांना आठ नक्कल देण्यात यावी अन्यथा १० मार्च रोजी चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग चिखली तालुक्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य उन्द्री रफीक शेख यांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर रफीक शेख, शेख अब्दुल कादीर गफार (ता. उपाध्यक्ष), शेख काजीम शेख गफ्फार, शेख कलीम शेख शब्बीर, घनश्याम मदगे आदींची स्वाक्षरी आहे.

Web Title: Give eight copies to those living in government space