दापोली  क्रीडा महोत्सवात खेळणार हिवरा आश्रमच्या मुली                                                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 15:07 IST2017-11-18T15:06:01+5:302017-11-18T15:07:18+5:30

हिवरा आश्रम : क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.  

The girls of the Hivra ashram, will play at the Dapoli Sports Festival | दापोली  क्रीडा महोत्सवात खेळणार हिवरा आश्रमच्या मुली                                                    

दापोली  क्रीडा महोत्सवात खेळणार हिवरा आश्रमच्या मुली                                                    

ठळक मुद्देदापोली येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरला होणार क्रीडा महोत्सवात

हिवरा आश्रम : डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.  
डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरला होवू घातलेल्या क्रीडा महोत्सवात अकोला कृषी विद्यापिठाचा मुलींचा संघ सहभागी होणार आहे.  हिवरा आश्रम येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी चतृर्थ वर्षाची स्वाती किसन शिंगणे व व्दितीय वर्षाची दिपाली मनोहर गिºहे या दोन विद्यार्थीनींची या संघात  निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विवेकानंद आश्रम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, जिमखाना प्रमुख शिवशंकर काकडे व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर, कर्मचाºयांनी त्यांचे कौतूक केले.

Web Title: The girls of the Hivra ashram, will play at the Dapoli Sports Festival