मुलीला फूस लावून पळविले : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST2021-08-22T04:37:37+5:302021-08-22T04:37:37+5:30

गीता लक्ष्मण फडके व सागर लक्ष्मण फडके (दोघेही रा. शारा ता. लोणार) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या ...

Girl kidnapped by seduction: Crime filed | मुलीला फूस लावून पळविले : गुन्हा दाखल

मुलीला फूस लावून पळविले : गुन्हा दाखल

गीता लक्ष्मण फडके व सागर लक्ष्मण फडके (दोघेही रा. शारा ता. लोणार) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ ऑगस्ट रोजी ते व त्यांची पत्नी शेतातून घरी आले. तेव्हा त्यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी दिसली नाही. तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता ती दुपारी ४ वाजता मावशीकडे जाते, असे सांगून पर्स घेऊन गेली, असे त्यांना कळाले.

तिच्या मावशीकडे चौकशी केली असता तिथेही ती नव्हती. तिच्या वडिलांना शारा येथील गीता लक्ष्मण फडके व तिच्या मुलावर संशय होता. म्हणून त्यांनी त्यांच्या शारा येथील नातेवाइकाला फडके यांच्या घरी विचारपूस करायला सांगितली. तेव्हा तुमची मुलगी माझ्या मुलासोबत कुठेतरी पळून गेल्याचे गीता फडके हिने सांगितले. मुलीच्या वडिलांनी दोघांचा शोध घेऊन ते मिळून न आल्याने त्यांनी पळवून नेल्याची तक्रार दिली असून, डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरूद्ध भादंवि कलम ३६३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए.एस. आय. अशोक नरोटे करीत आहेत.

Web Title: Girl kidnapped by seduction: Crime filed