गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

By ब्रह्मानंद जाधव | Published: July 1, 2023 11:10 AM2023-07-01T11:10:30+5:302023-07-01T11:10:53+5:30

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही देणार भेट

girish mahajan reached the spot on samruddhi mahamarg buldhana bus accident announced an aid of five lakhs to the families of the deceased | गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

googlenewsNext

ब्रम्हानंद जाधव, बुलढाणा, सिंदखेड राजा  : समृद्धी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघाताच्या घटनास्थळावर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सकाळी 10:45 वाजता भेट दिली. तसेच अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबईवरून निघाले आहेत. ते सुद्धा घटनास्थळाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मुख्यमंत्री सकाळी ९.३०पर्यंत ठाणे येथील निवासस्थानाहून एअरपोर्ट कडे निघाले आहेत. आधी विमानाने छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे समृद्धी महामार्गावरील ल अपघाताच्या घटनास्थळी पोहोचणार आहेत.  दरम्यान, गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. तसेच रस्ता  चांगला आहे पण चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. या अपघाताची चाैकशी सुरू असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.

Web Title: girish mahajan reached the spot on samruddhi mahamarg buldhana bus accident announced an aid of five lakhs to the families of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.