गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिर
By Admin | Updated: September 16, 2014 18:31 IST2014-09-16T18:31:39+5:302014-09-16T18:31:39+5:30
लोकमत सखी मंचचा उपक्रम

गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिर
खामगाव : आदिशक्ती आई अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात खास आकर्षण असलेल्या गरबा दांडियाचे प्रशिक्षण देण्यासाठी लोकमत सखी मंचने पुढाकार घेतला आहे. यासाठी खामगाव आणि जळगाव जामोद शहरात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नवरात्रात गरब्याच्या तालावर नाचताना अनेकांच्या नृत्याची लय चुकते. तर काहींना अजिबात गरबा दांडिया खेळता येत नाही. अशा परिस्थितीत मनातील सुप्त गुणांना वाव देणे शक्य होत नाही; मात्र आता गरबा दांडिया नृत्याच्या तालावर पावलांना वळविण्यासाठी लोकमत सखी मंचने उपलब्ध करून दिलेल्या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले असून, सखी मंच सभासदांसाठी १00 रुपये, तर इतर महिलांसाठी १५0 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात खामगाव येथे पूजा वाघमारे, तर जळगाव जामोद येथे आरती पलन प्रशिक्षण देणार आहेत. या संधीचा परिसरातील महिलांनी मोठय़ा संख्येने लाभ घेण्याचे आवाहन सखी मंचच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच संयोजिका मिनाक्षी फिरके यांच्याशी ९८५0३८२१४0 या क्रमांकावर संपर्क साधावा.