‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांची बदनामी
By Admin | Updated: August 17, 2014 00:03 IST2014-08-16T23:25:30+5:302014-08-17T00:03:38+5:30
‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून बदनामी करणार्याविरूध्द मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांची बदनामी
मलकापूर : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांच्या कन्या प्रियंका गांधी-वडेरा यांची, ह्यव्हॉटस अँपह्णच्या माध्यमातून बदनामी करणार्याविरूध्द मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस नेते शिवचंद्र तायडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी हे पाऊल उचलले.
शिवचंद्र तायडे यांच्या मोबाईलवरील ह्यव्हॉटस अँपह्णमधील छत्रपती ग्रुपमध्ये, महादेव मांजरे नामक इसमाने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३0 वाजता एक संदेश ह्यअपलोडह्ण केला. त्यामध्ये स्व. इंदिरा गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ह्यपोस्टह्ण होते. तायडे यांनी रात्री उशिरा तो संदेश बघताच, ताबडतोब पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.
याप्रकरणी शहर पोलिसांनी महादेव मांजरेविरूध्द भारतीय दंड विधान, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.