ठिबक सिंचनच्या नळ्या लंपास करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:01+5:302021-03-09T04:37:01+5:30
शामसुंदर बन्सीलाल राठी वय ५३ वर्षे रा. तळणी ता. मोताळा यांचे घुस्सर बु. शिवारात गावाशेजारील ४ एकर शेत आहे. ...

ठिबक सिंचनच्या नळ्या लंपास करणारे गजाआड
शामसुंदर बन्सीलाल राठी वय ५३ वर्षे रा. तळणी ता. मोताळा यांचे घुस्सर बु. शिवारात गावाशेजारील ४ एकर शेत आहे. शेतात यावर्षी कापसाचे पीक घेतले होते. कापसाचा हंगाम पूर्ण झाल्यामुळे त्यांनी शेतातील ठिबक नळ्या किमती अंदाजे ४० हजार रुपये शेताच्या धुऱ्यावर जमा करू गठ्ठे बांधून ठेवल्या होत्या. या नळ्या अज्ञात चोरट्यांनी शेतात मालवाहू वाहन आणून लंपास केल्या हाेत्या. याप्रकरणी बोराखेडी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. या प्रकरणाचा तपास शेलापूर बीटचे जमादार सहाय्यक फौजदार प्रल्हाद वानखडे, पोकॉ ज्ञानेश्वर धामोडे यांनी करून गुप्त माहिती आधारे मंगल नथू तायडे, याेगेश गणेश जाधव, अविनाश कैलास जाधव , अक्षय विनायक जाधव यांना अटक केली. त्यांना पाेलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आराेपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन पाेलिसांनी जप्त केले. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत.