शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात आढळल्या फंगस नॅट्स अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:13 IST

जळगाव खांदेश येथे आढळून आलेल्या आणि सापासारख्या दिसणाºया अळ्या गुरूवारी खामगावातील किसन नगर भागात आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकाच वेळी हजारो आणि लाखोच्या संख्येने साखळी पध्दतीने चालणाऱ्या आणि विविध आकारमान बदलणाºया अळ्या खामगावात गुरूवारी दुपारी आढळून आल्या. त्यामुळे शहरातील किसन नगर भागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अळ्या धोकादायक नसून, नागरिकांनी घाबरण्याचे काहीही एक कारण नसल्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर आणि त्यांनतर जळगाव खांदेश येथे आढळून आलेल्या आणि सापासारख्या दिसणाºया अळ्या गुरूवारी खामगावातील किसन नगर भागात आढळून आल्या. त्यामुळे किसन नगरातील एका विद्यालयाजवळील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाहता पाहता ही वाºया वाºयासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सापासारख्या चालणाºया आणि शीस्तीत पथसंचलन करणाºया या अळ्या पाहण्यासाठी एकच गर्दी केली. विविध आकार बदलणाºया या अळ्यांची परिसरात चांगलीच दहशत पसरली. दरम्यान, या अळ्यांपासून घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

अळ्या धोकादायक नाहीत!झुंडीनं आणि साखळी पध्दतीने चालणाºया फंगस नॅट्स अळ्यांची उपजिविका बुरशीवर तसेच सेंद्रीय घटकांवर चालते. १७-१९ दिवसांचा जीवनक्रम असलेल्या या अळ्या अजिबात धोकादायक नाहीत. ओलसर ठिकाणी या अळया आढळून येतात.शहरातील किसन नगर भागात फंगस नॅट्स अळ्या आढळून आल्याची माहिती आपणांस मिळाली आहे. या अळ्या धोकादायक नसल्या तरी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी केली जाईल. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाईल.-सौ. प्राजक्ता पांडेआरोग्य पर्यवेक्षक,नगर परिषद, खामगाव.

सापासारख्या दिसणाºया अळ्या दुपारी किसन नगर भागात आढळून आल्या. झुंडीच्या झुंडीने या अळ्या बाहेर पडत होत्या. या अळ्यांमुळे काही अंगावर शहारे उठले होते. परिसरातील नागरिक भयभित झाले होते.- वैभव चौकटकिसन नगर, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगाव