फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेनेच उद्धार!

By Admin | Updated: August 28, 2016 23:22 IST2016-08-28T23:22:05+5:302016-08-28T23:22:05+5:30

कामगार संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गावंडे यांचे प्रतिपादन.

Fule-Shahu-Ambedkari ideology is saved! | फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेनेच उद्धार!

फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेनेच उद्धार!

बुलडाणा(जि. बुलडाणा),दि. २८: फुले, शाहू, आंबेडकरांची राजकीय विचारधारा खर्‍या अर्थाने घेऊन चालणारा राजकीय पक्षच बहुजनांना सर्वार्थाने न्याय देऊ शकतो. यास्तव बहुजन समाजाने प्रस्तापीत पक्षांना नाकारून बहुजनवाद विचारसरणी स्वीकारून आपला उद्धार करून घ्यावा, असे प्रतिपादन शे तकरी, कामगार संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांनी काढले. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक सदस्य, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया व आंबेडकरवादी रि पब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्रीकृष्ण उबाळे यांना श्रद्धांजली अर्पण करताना गांधी भवन येथे २३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शेतकरी, कामगार संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गावंडे बोलत होते. श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी एच.एन.मोरे होते. यावेळी अशोक गोरे, नारायणराव जाधव येळगावकर, परमेश्‍वर गवई, दलित मित्र माधवराव हुडेकर यांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक बी.एस.खरात यांनी केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांंंची उपस्थिती होती.

Web Title: Fule-Shahu-Ambedkari ideology is saved!