गोठय़ाला आग; एक लाखाचे नुकसान

By Admin | Updated: March 26, 2016 02:17 IST2016-03-26T02:17:47+5:302016-03-26T02:17:47+5:30

तीन गोठय़ाला अचानक आग लागून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान.

Frozen fire; Loss of one lac | गोठय़ाला आग; एक लाखाचे नुकसान

गोठय़ाला आग; एक लाखाचे नुकसान

लव्हाळा (जि. बुलडाणा) : येथील जनावरांच्या तीन गोठय़ाला अचानक आग लागून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी १.३0 वाजता घडली. गोठय़ात जनावरे नसल्याने जीवित हानी टळली.
लोणी लव्हाळा येथील जनावरांच्या तीन गोठय़ाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. गोठय़ात जनावरे नसल्याने जीवित हानी टळली; मात्र शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. खुशालराव श्रीराम लहाने यांचे टिनपत्रे, गुरांचे कुटार, शेती उपयोगी अवजारे, ट्रॅक्टरचे टायर, सरपण आगीत जळाल्याने ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दौलत असाबे यांचे २0 हजार रुपयांचे तर गंगुबाई नारायण लहाने यांचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी सरपंच चंद्रभान लहाने, साहेबराव लहाने, ग्रामसेवक दत्तात्रय काळे, अमोल गारोळे, अमोल लहाने, सुभाष लहाने, गणेश लहाने, भगवान कुहिरे, अशोक गारोळे, धन्नु जैन, रवी लहाने, श्याम लहाने, विष्णू लहाने यांच्यासह मेहकर येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

Web Title: Frozen fire; Loss of one lac