शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

चिखली येथे बनावट अकृषक आदेशप्रकरणी अटकसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:52 AM

चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली न.प.कनिष्ठ अभियंता रवि पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांना १४ नोव्हेंबर रोजी चिखली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

ठळक मुद्देतलाठी रियाज शेख यांना पुन्हा अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली न.प.कनिष्ठ अभियंता रवि पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांना १४ नोव्हेंबर रोजी चिखली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. या घटनेमुळे बनावट अकृषक आदेश प्रकरणाशी संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.न.प.कनिष्ठ अभियंता रवि महादेव पारसकर यांनी २२ फेब्रुवारी २0१७ रोजी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आशिष शरदचंद्रआप्पा बोंद्रे व विश्‍वजित र्जनाधनआप्पा बोंद्रे यांनी त्यांच्या मालकीचे चिखली येथील सर्व्हे न.१0६ मधील एकूण ७ प्लॉट चिखली नगर परिषदेला १३ लाख ९६ हजार ८00 रूपयांत विकण्याचा सौदा २३ मार्च २0१६ रोजी दस्त क्रमांक १९८५ नुसार नोंदणीकृत खरेदीखत करून दिलेला आहे. सदरहू खरेदीखत नोंदवितेवेळी न.प.चिखलीने खरेदीखतासाठी ६९ हजार ९00 रूपयांचे नोंदणी शुल्क भरले होते. त्यानंतर संजय बोंद्रे यांनी न.प.कडे तक्रार देऊन सदरच्या खरेदी व्यवहारात न.प.चिखलीची फसवणूक झाल्याचे नमूद केल्याने सौदय़ाची रक्कम आरोपीला अदा करण्यात आली  नाही. त्यानंतर न.प.खरेदी व्यवहारात आरोपीतांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, ते खोटे व बनावट असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणात आशिष बोंद्रे, विश्‍वजित बोंद्रे यांनी संगणमत करून खोटे व बनावट अकृषक आदेश, फेरफार, सात-बारा उतारे तयार करून पालिकेची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याने चिखली पोलिसांनी अप.क्र.८४/२0१७ कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हय़ाच्या तपासात आरोपी चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांनी उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या नावाने सर्व्हे न.१0६ मध्ये बनावट अकृषक आदेश क्रमांक रे.के.क्र./एन.ए.पी.३४/ चिखली/३८/२0१0-२0११ ६/७/२0११ तसेच फेरफार व सात-बारा खोटा तयार करून शासनाची फसवणूक करण्यासह कायद्याची कोणतीही धास्ती न बाळगता उपविभागीय अधिकारी कार्यालयासारखे वरिष्ठ कार्यालयाचे बनावटी आदेश तयार करून थेट शासकीय यंत्रणेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्हय़ात आरोपी शे.रियाज शे.अहेमद (वय ४२) यास १४ नोव्हेंबरला अटक करण्यात आली असून, १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड ठोठावण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रल्हाद मदन व पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद तांबेकर करीत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा